Saturday, May 4, 2024
Homeनगरभिंगार छावणी परिषदेची 10 कोटी रुपयांची फसवणूक

भिंगार छावणी परिषदेची 10 कोटी रुपयांची फसवणूक

अहमदनगर (प्रतिनिधी) –

भिंगार छावणी परिषदेच्या वाहन प्रवेश कराची करार भंग करून अनाधिकाराने वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. यामुळेे छावणी

- Advertisement -

परिषदेची 10 कोटी 20 लाख 25 हजार 510 रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणात मयत व्यक्तीच्या नावे कर वसूलीचा ठेका घेण्यात आलेला आहे. फसवणूक प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक महिती अशी, भिंगार छावणी परिषदेच्या पारगमन शुल्क वसुलीसाठी 2015 मध्ये पुणे येथील मेसर्स ओमकार कन्स्ट्रक्शनने ठेका घेतला होता. या कन्ट्रक्शनचे मालक पिलोकसिंग खडकसिंग रावल हे 11 सप्टेंबर 2015 रोजी मयत झालेले होते. मात्र, विकी चंद्रलाल लालवानी (रा. हेमू कॉलनी गार्डन जवळ, प्लॉट /327 पिंपरी, पुणे) याने छावणी परिषदेला याची माहिती दिली नाही.

ठेका घेण्यासाठी तयार करण्यात आलेले मुखत्यारपत्र हे संपुष्टात आल्यानंतर ही त्या मुखत्यारपत्राचा वापर करून मयत रावल हे जिवंत असल्याचे भासविले. आरोपी लालवानी याने 11 सप्टेंबर 2015 ते 30 जून 2016 पर्यंत छावणी परिषदेचा पारगमन शुल्क अनाधिकाराने वसूल करत राहिला. करार भंग करून पारगमन शुल्कमध्ये अपहार केला.

यात छावणी परिषदेची 10 कोटी 20 लाख 25 हजार 510 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी छावणी परिषदेचे वरिष्ठ लिपिक शिशिर पाटसकर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून विकी चंद्रलाल लालवानी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या