Wednesday, May 8, 2024
Homeजळगाव‘निःस्वार्थ’ची जनसेवा; निराधारांना एक घास मायेचा

‘निःस्वार्थ’ची जनसेवा; निराधारांना एक घास मायेचा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील रस्त्यावरील निराधार आजी-आजोबांची एक वेळची भूक शमविण्यासाठी शहरातील काही युवक निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, ़फूड बँकेच्या माध्यमातून एकत्र येवून रस्त्यावरील अनाथ आजी-आजोबांची एक वेळेची भूक शमविण्याचे कार्य करीत आहेत.

- Advertisement -

यात विवेकानंद शाळेचे शिक्षक धीरज जावळे, सुलतान पटेल, मुंडले ब्रदर्स संचालक राकेश मुंडले, एरडोल पोलिस धनंजय सोनवणे सर, फारूक पटेल, रोशन मुंडले, कला शिक्षक नकुल सोनवणे, विजय पाटील,आर्यन स्कूलचे उपमुख्याध्यापक अविनाश जावळे अश्या या 10 युवकांनी निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, ़फूड बँकच्या माध्यमातून रस्त्यावरील अनाथ आजी-आजोबांना दररोज जेवण वाटपची चळवळ सन 2017 ला सुरु केली होती.

सलग दोन वर्षात एकही दिवस खंड न पडू देता या युवकांनी निराधार व अनाथ आजी-आजोबांची भूक शमविन्याचे कार्य अविरत सुरु ठेवले आहे.

कोणत्याही ऋतुची तमा न बाळगता या युवकांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर न चुकता अनाथ आजी-आजोबाना वेळेवर जेवण वाटप केले आहे.

कोरोना सारख्या महामारीत ही या युवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण लॉकडाऊन काळात ही रस्त्यावरील निराधार,अनाथ व गरीब गरजू लोकांना जेवण वाटप केले.

आता या चळवळीत शहरातील अनेक अन्नदाते जुड़ले व त्यांनी ही निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, ़फूड बँकेच्या कार्यात सहभागी होवून मदत करीत आहेत.

निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, ़फूड बँकेच्या युवकांना या सामाजिक कार्यासाठी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे व जळगाव शहरातील पोलिस दल आणि न्यायाधीश संघाने या युवकांचे कौतुक केले आहे. हे युवक, आप-आपल्या नातेवाईक व मित्र मंडळींना सुद्धा निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, ़फूड बँकेच्या कार्यात सामिल करून त्यांचे वाढदिवस व आनंदोत्सव या अनाथ आजी-आजोबांना जेवण वाटप करून त्यांची एकवेळेची भूक शमविन्यास प्रोत्साहित व आवाहन करत असतात. त्यामुळे माणुसकीचे येथे दर्शन घडतेय.

- Advertisment -

ताज्या बातम्या