Saturday, May 4, 2024
Homeधुळे‘राम चरित्र’ देशाला कधी विभक्त होऊ देणार नाही

‘राम चरित्र’ देशाला कधी विभक्त होऊ देणार नाही

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

प्रभु श्रीराम आपली अस्मिता, आस्था आहे. रामाचे चरित्र देशाला कधीही विभक्त होवू देणार नाही. रामचरित्र देशाला संघटीत करू शकते.

- Advertisement -

देशात समरसता निर्माण करू शकते. रामचरित्र प्रभावी आणि सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन सतपंथ मंदिर संस्थानचे महामंडलेश्वर महंत स्वामी श्री जनार्दनहरि महाराज यांनी केले. दरम्यान श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानात जिल्ह्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांच्यासह उपस्थित संत, महंतांनी केले.

शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात आज संत संमेलन झाले. संमेलनाची सुरूवात दिपप्रज्वलीत करून करण्यात आली.

रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह राजेश पाटील यांनी सर्व प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. त्यानंतर महंमत योगी दत्तनाथ महाराज यांनी श्रीराम जन्मभुमीचा 492 वर्षाचा इतिहास सांगितला. तसेच श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर महंत जनार्दनहरि महाराज यांनी सांगितले की, अयोध्येतील प्रभु श्रीराम जन्मस्थानावर फक्त मंदिर नव्हते तर राष्ट्र मंदिर निर्माण करायचे आहे. हे राष्ट्र मंदिर सर्व जात, संप्रदाय, पंथ, समाजाने एकत्र येवून करायचे असल्याचे सांगत निधी समर्पण अभियानात जिल्ह्यातून जास्ती जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी आर्वीतील रोकडोबा हनुमान मंदिराचे गादीपती 1008 वैष्णवदास महाराज, किन्नर आखाडा प्रमुख, यल्लला माता मंदिराचे महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी परशुराम जोगी, हभप परमेश्वर महाराज, हभप मच्छिंद्र महाराज, हभप सुदर्शन महाराज, महंत आमलाल महाराज, योगी दत्तनाथ महाराज, महंत सर्वेश्वरदास महाराज, महंत प्रणवगिरी महाराज, संजय चौधरी आदी उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगीराज मराठे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या