Monday, November 11, 2024
Homeदेश विदेशकेंद्र सरकारचा मोठा निर्णय, नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती 'पराक्रम दिन'...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरी केली जाणार

दिल्ली | Delhi

आझाद हिंद फौजेचे संस्थापक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख चेहरा सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिन’ (Parakram Diwas) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या वर्षानिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनासाठी उच्चस्तरिय समिती स्थापन केली होती. या संबंधित उच्च स्तरीय कमेटीचे नेतृत्व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. 85 सदस्य असणाऱ्या या कमेटीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह काही राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यासह पक्ष-विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते आणि नेताजींच्या परिवारातील सदस्य यामध्ये सहभागी असणार आहेत. नेताजी यांच्या संबंधित कार्यक्रमांची सुरुवात 23 जानेवारीला असणाऱ्या त्यांच्या जयंती पासून सुरुवात होणार आहे.नरेंद्र मोदी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात 23 जानेवारील कोलकाता मधील ऐतिहासिक विक्टोरिया मेमोरियल हॉल येथून करणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या