Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनसोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'ती' याचिका फेटाळली

सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने (BMC) सोनू सूदला अवैध बांधकामप्रकरणी नोटीस बजावली होती. मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर

- Advertisement -

सोनू सूद (Sonu Sood)ने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी सोनू सूदविरोधात मुंबई महानगरपालिकेने जुहू पोलिसांत तक्रार केली होती. सोनू सूदने जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केले असल्याचा दावा महानगरपालिकेने केला होता. पालिकेने अवैध बांधकामावर आक्षेप नोंदवला होता. मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. झालेल्या सुनावणीमध्ये महानगरपालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात हजारो गरीब मजुरांना सोनू सूदने स्वत:च्या पैशांनी घरी पाठवण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेक लोकं त्याला देव मानतात. सोनू सूदच्या त्या कृतीलादेखील शिवसेनेकडून ‘हा राजकीय डावेपच’ असल्याचा आरोप केला झाला होता. त्यानंतर सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या