Saturday, May 4, 2024
Homeनगरअण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ट्रॅक्टर रॅली

अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ट्रॅक्टर रॅली

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

दिल्लीतील शेतकरी आंदोलन व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी ते पारनेर तहसील कार्यालय अशी

- Advertisement -

ट्रॅक्टर तिरंगा रॅली राळेगण सिध्दी येथील संत यादवबाबा मंदिर परिसरातून मंगळवारी काढण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. परिसरातील सुमारे 35 ते 40 ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले होते.

यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, अण्णा हजारे जिंदाबाद, अण्णाहजारे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, शेतकरी एकजुटीचा विजय असो या घोषणांनी राळेगणसिद्धी परिसर दुमदुमून गेला होता. राळेगणसिद्धी, पिंपळनेर व पानोली येथील शेतकरी ट्रॅक्टरसह आंदोलनात सहभागी झाले होते.

राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, शंकर नगरे,पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, भाकपचे तालुका सचिव संतोष खोडदे, अंकुश गायकवाड, दादा पठारे, दत्ता आवारी, शाम पठाडे, किसन मापारी, सुभाष पठारे, नानाभाऊ मापारी, रमेश औटी, संदीप पठारे, रोहिदास पठारे, सदाशिव पठारे, गणेश भापकर, सुभाष गाजरे, रामदास भोसले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या