Saturday, May 4, 2024
Homeनगरचिंचोली फाट्यावर हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

चिंचोली फाट्यावर हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

राहुरी (प्रतिनिधी) –

राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावरील एका हॉटेलात हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय

- Advertisement -

चालू असल्याची खबर मिळताच पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. नंतरच ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्यावर येथील हॉटेल नंदादीपवर छापा टाकून धाडसी कारवाई केली. याप्रकरणी हॉटेलचालक सुनील रामचंद्र हारदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून राहुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.

दरम्यान, या घटनेतील दोन परप्रांतीय बंगाली तरूणींना ताब्यात घेण्यात आले असून नंतर त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. राहुरी तालुक्यातील सहा महिन्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी राहुरी खुर्द येथे भरत हॉटेलवर अशी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नगर-मनमाड महामार्गावरील अवैध धंदे करणार्‍या ढाबाचालक व हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

काल दि. 29 जानेवारी रोजी संदीप मिटके यांना हॉटेल नंदादीप, चिंचोली फाटा येथील हॉटेलचालक सुनील रामचंद्र हारदे हा पीडीत महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे, असे खात्रीशीर खबर मिळाली. त्यानुसार हॉटेल नंदादीप येथे बनावट ग्राहक पाठवून शासकीय पंचासमक्ष छापा टाकून दोन पीडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका केली. आरोपी सुनील रामचंद्र हारदे यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे, स.फौ. राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ. सुरेश औटी, अण्णासाहेब चव्हाण, राधिका कोहकडे, पोकॉ. रवींद्र मेढे, सुनील शिंदे, सचिन ताजणे, सचिन लोंढे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या