Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशVideo : उत्तराखंडमध्ये हिमकडा तुटल्याने धरणाचा बांध फुटला

Video : उत्तराखंडमध्ये हिमकडा तुटल्याने धरणाचा बांध फुटला

दिल्ली | Delhi

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे मोठी दूर्घटना घडली आहे. उत्तराखंडच्या जोशीमठाच्या रेणी भागातील ऋषिगंगा प्रोजेक्टवर हिमकडा कोसळल्यानंतर प्रकल्पाला मोठं नुकसान झाल्याचं समजते आहे.

- Advertisement -

यामुळे, जोशीमठ भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालीय. धरण फुटल्यानं धौलीगंगेच्या पाणीपातळी प्रचंड वाढ झाली आहे. अचानक पूर आल्यानं नदीकाठावरील घराचं तडाखा बसला असून, अनेकजण बेपत्ता झाले आहेत. यापार्श्वभूमीवर जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. घटनास्थळी एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या असून मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे.

तसेच आतापर्यंत १५० ते २०० जण बेपत्ता असल्याची शक्यात वर्तवण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिद्धिमा अग्रवाल यांनी सांगितलं की, अनेक लोक दोन वीज प्रकल्पांवर काम करत होते. जोशीमठमध्ये हिमकडा कोसळल्याने पाण्याच्या वेगवान प्रवाहाने वाटेत आलेल्या दोन प्रकल्पांवर अनेक लोक काम करत होते. दोन्ही वीज प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १०० ते १५० लोकांबाबत माहिती नसल्याचं समोर आलं आहे. अचानक आलेल्या महापूरानंतर या लोकांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

उत्तराखंड जिल्ह्यातील चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात रविवारी हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा बसला आहे. जोशी मठ परिसराजवळच ही घटना घडली असून, हिमस्खलन झाल्यानं ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर गंगेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून किर्ती नगर, देवप्रयाग, मुनी की रेती या भागांत पाण्याचा जोरदार प्रवाह पहायला मिळत आहे. यामुळे ग्रामस्थांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अनेक नागरिक यात अडकल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर एसडीआरएफडी टीम घटनास्थळी तात्काळ दाखल झाली असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे आणि नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

दरम्यान, या महाभयंकर घटनेवर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टचमोली जिल्ह्यात ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्कालीन विभागांना आपत्ती निवारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खबरादारीचे सर्व उपाय योजले जात आहेत, असं रावत यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या