Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजेईई मेन परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

नाशिक । प्रतिनिधी

जेईई मेन 2021 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) फेब्रुवारी सत्राच्या जेईई मेन 2021 परीक्षेची उत्तरतालिका तसेच जेईई मेन मार्च 2021 सत्रासाठीचे अर्ज जारी केले आहेत.

- Advertisement -

जेईई मेन 2021 मार्च सत्रासाठीचे अर्ज वेबसाइटवर उपलब्ध आहेत. मार्चच्या सत्रासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च आहे.

जेईई मेन मार्चसाठी अर्ज शुल्क 650 रुपये आहे तर महिला / अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडीसाठी 325 रुपये आहे.

विद्यार्थी जर जेईई परीक्षा पहिल्यांदा देत असतील तर नवीन नोंदणी करू शकतात किंवा आधीच नोंदणीकृत उमेदवार मार्चच्या सत्रासाठी अर्ज करू शकतात. जेईई मेनचे दुसरे सत्र 15 ते 18 मार्च दरम्यान होईल.

अर्ज कसा करावा?

* प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.

* यानंतर आपले नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल पत्ता आदि माहिती देऊन नोंदणी करा.

* आता जेईई मेनचा अर्ज भरा.

* फोटो आणि स्वाक्षरीची स्कॅन कॉपी अपलोड करा.

* आता जेईई अर्ज शुल्क भरा.

* कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या