Saturday, May 4, 2024
Homeराजकीय'या' राज्यांमध्ये भाजपचा पराभव होईल; शरद पवारांचं मोठं विधान

‘या’ राज्यांमध्ये भाजपचा पराभव होईल; शरद पवारांचं मोठं विधान

बारामती (Baramati)

आगामी पाच राज्यातील निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बारामती येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

- Advertisement -

‘आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल’, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले,’पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.’

त्याचबरोबर, माझ्या दृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. राज्यही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नाही, असंही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, मात्र सचिन वाजे प्रकरणा बाबत मी काही सांगू शकत नाही. असं म्हणत यावेळी शरद पवार यांनी सचिन वाझेंबाबत मात्र बोलणं टाळलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या