Saturday, May 4, 2024
Homeजळगावबंद घराचे कुलूप तोडून साडे चार लाखांचा मुद्देमाल लंपास

बंद घराचे कुलूप तोडून साडे चार लाखांचा मुद्देमाल लंपास

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील फुले कॉलणीत एकाच्या बंद घराचे कुलूप तोडून, घरातील कपाटात ठेवलेल्या पाच तोळा सोने व रोख रक्कम असे एकूण साडे चार लाखांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला . याबाबत शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अशोक श्रीधर येवले (वय- ६१ रा. फुले कॉलणी) ता. चाळीसगाव येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. अशोक येवले हा जमीन खरेदी विक्री एजंचा काम करतात. दि. १८ मार्च रोजी सकाळी अचानक पत्नी शारदा येवले हिच्या तब्येतीत बिघाड झाल्याने उपचारासाठी शहरातील दवाखान्यात दाखल केले. परंतु तब्येतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथील ऋषीकेश हॉस्पिटलात दि. २२ मार्च रोजी दाखल करण्यात आले. दरम्यान घराला कुलूप लावून बंदच होता. दि.२७ मार्च रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अशोक येवले यांचे मोठे भाऊ प्रकाश श्रीधर येवले यांनी अशोक येवले यांना घराचे कडी कोंडा तोडल्याची माहिती फोनद्वारे दिली. तेव्हा लगेच अशोक येवले हे आपल्या घरी येऊन पाहणी केली असता, घरातील कपाटाच्या ठेवलेले २२ ग्रॅमची सोन्याची पोत, १३ ग्रॅम मंगळसूत्र, १५ ग्रॅमच्या सोन्याच्या वीस पुतळ्या व ३,१५००० रू रोख रक्कम असे एकूण ४, ६३००० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे कळताच शहर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या