Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील करोनाचे संकट वाढले

पुण्यातील करोनाचे संकट वाढले

पुणे-

पुणे शहरात करोनाने उच्छाद मांडला आहे. एका दिवसात चार हजारपेक्षा जास्त नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे.

- Advertisement -

त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि प्रशासनाकडून विविध पाऊले उचलली जात आहेत. दरम्यान, रुग्णांची संख्या वाढल्याने पुन्हा एकदा करोनाग्रस्त रुग्णांना खाटेसाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे आता शहरातील सर्व रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

पुणे शहरात दिवसाला चार हजार पेक्षा जास्त नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रुग्णालयांच्या खाटा पूर्णपणे भरल्या आहेत. महापालिकेला शहरात साधारण २६०० खाटा कमी पडत आहेत.

डॅशबोर्ड वरील आकडेवारीनुसार शहरात साधारण ५००८ खाटा आहेत. यापैकी फक्त ४९० खाटा शिल्लक आहेत. यामध्ये साध्या खाटा २४३, ॲाक्सिजन खाटा २१७, व्हेंटिलेटर शिवायचे आयसीयुच्या खाटा २० तर फक्त १० व्हेंटिलेटर खाटा शिल्लक आहेत. याच पार्श्वभुमीवर आता खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या