Saturday, May 4, 2024
Homeनाशिकईएसआयसी कोविड सेंटरच्या जागी लसीकरण केंद्र

ईएसआयसी कोविड सेंटरच्या जागी लसीकरण केंद्र

सातपूर | प्रतिनिधी

सातपूर परिसरातील इएसआयसी रुग्णालयातील काविड सेंटर मागिल काळात जोरात सूरू करण्यात आले होते. मात्र, मध्यंतरी रोडावलेल्या रुग्ण संख्येनंतर ते बंद करण्यात आलेे. आता या सेंटरमध्ये कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे लसिकरण वेगाने सूरू आहे…

- Advertisement -

सातपूर येथील इएसआयसी रुग्णालयाच्या इमारतीमधील एका 50 खाटांच्या वॉर्डात कोविड सेंटर उभारण्यात आले होते. रुग्णालयाच्या मागिल बाजूने त्यांना प्रवेश ठेवण्यात आला होता. त्यामुळे संख्या पहाता कोविड सेंटर बंद करण्यात आलेले होते.

दरम्यान, शासनाने लसीकरणाला गती दिलेली असल्याने या सेंटरच्या जागी लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. लसीकरणासाठी कामगार बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करीत आहेत. शहर परिसरात वाढणार्‍या रुग्णांची संख्या लक्षात घेता कोविड सेंटर सूरू केल्यास लसिकरण थांबवावे लागेल.

प्रत्यक्षात पहिल्या फेरीत लसीकरण केलेल्यांची दूसरी फेरी सूरू होणार आहे. त्यांची गर्दी लक्षात घेता लसीकरण थांबवणे कठीण होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे इएसआयसी कोविड सेंटर सूरू करणे सद्यातरी शक्य दिसून येत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या