Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशलसीचा तुटवडा का? सीरमचे पूनावाला यांनी दिले कारण...

लसीचा तुटवडा का? सीरमचे पूनावाला यांनी दिले कारण…

नवी दिल्ली

राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासंदर्भात राजकारण रंगले आहे. परंतु लसीचा तुटवडा का निर्माण झाला? याची माहिती पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी दिली. त्यांनी लसीचा तुटवडी निर्माण होण्यामागे अमेरिका असल्याचा आरोप केला.

- Advertisement -

जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी संस्था म्हणून सीरम इन्स्टिट्यूटची ओळख आहे. एस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. भारतात ही लस कोविशिल्ड नावाने दिली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितले की, देशात कोरोना लस निर्मितीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. युरोप आणि अमेरिकेने महत्त्वाच्या अशा कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्याने लस निर्मितीत अडथळा येत आहे. कोरोना लशीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. अमेरिकेने महत्त्वाचा असा कच्चा माल रोखला आहेत जो कोव्हॅक्सिन आणि भारतासह जगभरातील इतर देशांमध्ये लशीसाठी गरजेचा आहे. व्हॅक्सिन निर्मितीत यामुळे अडथळा येत आहे. आम्ही यासाठी संघर्ष करत आहे कारण आम्हाला याची अजुनही गरज आहे. आम्हाला सहा महिने किंवा एक वर्षानंतर याची गरज नाही. तोपर्यंत आम्ही दुसरा पुरवठादार शोधू किंवा तयार करू असेही आदर पूनावाला म्हणाले.

आदर पूनावाला म्हणाले की, सीरम यावर्षी जून महिन्यापर्यंत १० ते ११ कोटी लशींचे डोसची निर्मिती करण्यासाठी तयार आहे. आम्ही भारतीयांना प्राधान्य देत असून यासाठी सरकारसोबत काम करत आहे. सरकारने दोन ते तीन महिन्याच्या कालावधीसाठी लशीची किंमत स्थिर ठेवण्यासाठी आणि भारतात पुरवठा करण्याबाबत सरकारची विनंती मान्य केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या