Saturday, May 4, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - वृश्चिक Quarterly Future Scorpio

त्रैमासिक भविष्य – वृश्चिक Quarterly Future Scorpio

सौ. वंदना अनिल दिवाणे

एप्रिल – 2021

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, तृतीयात गुरू-शनि-प्लुटो, चतुर्थात नेपच्यून, पंचमात रवि-बुध-शुक्र, षष्ठात-हर्षल सप्तमात मंगळ- राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी,यू अशी आहेत. राशीचे चिन्ह विंचू आहे. राशी स्वामी मंगळ. उत्तर दिशा फायद्याची आहे. राशी लिंग स्त्री आहे. म्हणून स्वभाव सौम्य, वर्ण ब्राह्मण, कफ प्रवृत्ती. पाठीसंबंधी विकाराची काळजी घ्यावी. शुभ रत्न पोवळे, शुभ रंग लाल, शुभ वार मंगळवार, देवता- हनुमान, भैरव. शुभ अंक- 9, शुभ तारखा- 9, 18, 27. मित्र राशी कर्क, मीन. शत्रु राशी- मेष, सिंह, धन.ु क्षमा करणार नाही. सूड घेण्याची वृत्ती. संधी मिळताच शत्रुवर वार. पण प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी. रसायने, औषधे, डॉक्टर्स यांच्यासाठी चांगली रास.

पंचमात रवि आहे. प्रवासाला निघावेसे वाटेल. विद्याभ्यासात चंचल बुध्दीमुळे खंड पडेल. काहीही करून पैसा मिळवलाच पाहिजे. अशी मनाला ओढ लागेल. त्यासाठी शेअर्स, व्यापार, बिनभरवश्याच्या बँकेत गुंतवणूक अशा प्रकारचे व्यवहार कराल. पण हे व्यवहार जरा जपून करा.

स्त्रियांसाठी – सौंदर्यवृद्धीसाठी ब्युटी पार्लरला भेट द्यावी वाटेल. पतीराज खुष असल्याने अलंकाराची खरेदी होईल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता तीक्ष्ण राहील. त्यामुळे परीक्षा देणे जास्त अवघड जाणार नाही. लेखनाचा सराव वाढवा मार्कांमध्येही वाढ होईल.

शुभ तारखा – 4, 5, 7, 8, 13, 17, 18, 19, 21, 22, 24, 25

मे – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, तृतीयात शनी-प्लुटो, चतुर्थात गुरू-नेपच्यून,षष्ठात हर्षल- रवि, सप्तमात राहू-शुक्र- बुध, अष्टमात मंगळ, अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात गुरू आहे. चतुर्थस्थानातील गुरूमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकीकात भर पडेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. धिमा व समाधानी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना यात विशेष अनुभव येईल. सांपत्तिक आवक सुरळीत राहील. भाग्योदयासाठी घरापासून जास्त दूर जाण्याची गरज नाही. भपक्याची हौस वाटेल. परदेशगमन करून भाग्य आजमावे.

अकल्पित भाग्योदय होण्याचा योग आहे. सरकारी दरबारी काम वाढेल. पुत्र व गृह यांचे सुख उत्तम राहील. आहार सिमीत परंतू समतोल राहील. कामात एकाग्रता साध्य होईल. बौद्धिक कामात प्रगती होईल. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

स्त्रियांसाठी- सप्तमात वृषभेचा शुक्र आहे. वैवाहिक सुख चांगले राहील. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. लोकरंजन करणार्‍या संस्थामधून प्रगती होऊन प्रयत्न केल्यास आर्थिक लाभ होईल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 1, 3, 4, 5, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 26, 28, 30, 21

जून – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, तृतीयात शनी-प्लुटो, चतुर्थात नेपच्यून- गुरू, षष्ठात हर्षल, सप्तमात बुध-शुक्र-राहु, अष्टमात शुक्र नवमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा राहील. सासरवाडीकडून मदतीसाठी विचारणा होण्याची शक्यता आहे.

सप्तमात बुध आहे. विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील. भावी पत्नी सुविद्य मिळेल. व्यापार्‍यांना चांगले भागीदार मिळतील. आर्थिक आवक वाढेल. कलाकौशल्यात प्रगती होईल. विनोदप्रियतेमुळे घरात व बाहेर तणाव राहणार नाही.

अष्टमात शुक्र आहे. पत्नीकडील नातेवाईकांंडून आर्थिक मदतीची शक्यता दर्शविते. मात्र धनप्राप्ती बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवा धनप्राप्ती स्वकष्टावर आधारित असावी. अवैध मार्गाचा अवलंब करू नये.

स्त्रियांसाठी – अष्टमात शुक्र आहे. अभिमानाची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण आणि कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष असतील.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमात गुरू आहे. विद्यार्थी व अध्ययनात विशेष प्रगती करू शकतील. आळस झाडून नियमितपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. केल्याने होत आहे रे हे संत रामदासांचे वचन लक्षात ठेवा.

शुभ तारखा – 2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

- Advertisment -

ताज्या बातम्या