Saturday, May 4, 2024
HomeनाशिकVideo : कोणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!...

Video : कोणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!…

सातपूर | प्रतिनिधी

जिल्ह्यात ठिकठिकाणी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढू लागली असून सातपूर येथील नाशिक ऑक्सिजन कारखान्याबाहेर गॅस घेण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी दिसून आली…

- Advertisement -

शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने विविध रुग्णालयांच्या वतीने ऑक्सीजन सिलेंडर नेण्यासाठी नाशिक अक्सिजन कारखाने बाहेर वाहनांची प्रचंड होती.

सुमारे 35 ते 40 वाहने रांगेत उभी होती सकाळी सात वाजेपासून लोकांनी या ठिकाणी रांगा लावल्या होत्या. ऑक्सीजन सिलेंडर मध्ये भरणे आणि त्याचे वाटप करणे यासाठी विलंब लागत असल्याने वाहनचालकही चिंतित झाले होते.

याबाबत वाहनचालकांची संवाद साधला असता चार ते पाच वर्षापासून कारखान्या बाहेर उभे असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय नेत्यांची नाव सांगून रांगांना डावलून सिलेंडर वाटप केले जात असल्याची तक्रारही या ठिकाणी उभी असलेल्या चालकांनी केली.

याबाबत व्यवस्थापनाची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

या ठिकाणी रिक्षा चालक ही सिलेंडर ची वाहतूक करीत असल्याबद्दल या वाहन चालकांनी आश्चर्य व्यक्त केले. रांगेत उभे असलेल्या वाहन चालक यांनी प्रवेशद्वारावर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे संरक्षित खासदाराचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. व्यवस्थापनाने सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्तही तैनात केल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या