Friday, April 25, 2025
Homeनाशिकदुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात एकवीस वर्षीय युवतीचा मृत्यू

दुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात एकवीस वर्षीय युवतीचा मृत्यू

दिंडोरी | नितीन गांगुर्डे

दिंडोरी – नाशिक रस्त्यावरील वनारवाडी पाटाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात 21 वर्षीय युवती ठार झाली असून वनारवाडी शिवारातील अशी दुसरी घटना घडल्याने त्यामुळे दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे .

- Advertisement -

दिंडोरी – नाशिक रस्त्यावरील वनारवाडी पाटाजवळ राजू चव्हाण यांचं शेत आहे. गावातील अखंड हरिनाम सप्ताह संपल्यानंतर चव्हाण कुटुंबीय त्यांच्या शेतात गवत कापण्याचे काम करत होते. त्यावेळी पायल राजू चव्हाण ही मुलगी ऊसालगत गवत कापत असताना अचानक बिबट्याने मागील बाजूने येऊन हल्ला केला. बिबट्याने तिच्या मानेला धरले तिने आरडाओरड केली. तिच्या शेजारी असलेल्या बहिणीने बिबट्याने धरल्याचे पाहताच आरडाओरड केला. त्यावेळी पायल कडे धावले त्यानंतर बिबट्याने पायलला 6-7 फूट ओढत नेले.

आजूबाजूचे शेतकरी पायलचे वडील चुलते व नातेवाईक ऊसाकडे धावले बिबट्याने गलका- आवाज ऐकल्यावर पायलला तिथेत बिबट्याने सोडून पळ काढला.  पायलला नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरनी नकार दिल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी वन विभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी धाव घेतली .तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यानी तपासणी केली असता पायलला मृत घोषित केले आहे. दरम्यान वारंवार बिबट्यांच्या हल्ल्याने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी व पायलच्या कुटुंबीयांनी  शवविच्छेदना नंतर पायलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. बिबट्याचाचा बंदोबस्त करावा ही मागणी करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्यात एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai राज्यातील विविध महानगरात वेगवेगळ्या परिवहन सेवा कार्यरत आहेत. या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या जाणार असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण...