Saturday, July 27, 2024
Homeजळगावमेहरुण तलावात बुडून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मेहरुण तलावात बुडून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील जगवानी नगरात राहणार्‍या बबन नामदेव पवार (वय-63) यांचा मेहरुण तलावात (Mehrun lake)बुडून (drowning) मृत्यू (died)झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

एक विवाह असाही…तांदलवाडीत वैद्यकीय व्यावसायिकाने घेतले चार एकरांत 93 टन टरबुुजाचे उत्पादन

शहरातील जगवानी नगरात बबन पवार हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. त्यांचा मुलगा पोलीस दलात कर्मचारी आहे. बबन पवार हे बुधवारी सायंकाळी घराबाहेर पउले होते. गुरूवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मेहरूण तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या काही वन्यजीव पथकातील काही सदस्यांना वृध्दाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसला. त्यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी नाना तायडे, सुनिल सोनार, समाधान टहाळके, विकास सातदिवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिसरात असलेल्या राजेश सोनवणे, रविंद्र भोई, अजीब काझी या पोहणार्‍यांच्या मदतीने पोलिसांनी वृद्धाचा मतदेह बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला.

बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरलीबारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..

कागदपत्रांवरुन पटली ओळख

पवार यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांच्या खिशात मिळून आलेल्या कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंंबियांशी संपर्क करुन त्यांना घअनेची माहिी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी समाधान टाहकळे करीत आहे.

Makeup Part 6 : न्यू जनरेशन कॉस्मेटिक्स

मुलाचा मन हेलावणारा आक्रोश

बबन पवार या वृद्धांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर पवार हे पोलीस दलातील कर्मचारी विकास पवार यांचे वडील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी वडीलांचा मृतदेह बघताच मनहेलावणारा आक्रोश केला. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात मुलगा, सून असा परिवार आहे.

Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

- Advertisment -

ताज्या बातम्या