Wednesday, April 2, 2025
Homeधुळे75 वर्षीय वृध्दाने सात वर्षीय बालकावर केला अनैसर्गिक अत्याचार

75 वर्षीय वृध्दाने सात वर्षीय बालकावर केला अनैसर्गिक अत्याचार

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील देवपूर भागात असलेल्या कालिका नगरात एका 75 वर्षीय वृध्दाने सात वर्षीय बालकावर निर्मनुष्य परिसरात अनैसर्गिक अत्याचार केला. याची वाच्चता करू नये म्हणून बालकाला धमकीही दिली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत कालिका नगरात राहणार्‍या पीडित बालकाच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या सात वर्ष नऊ महिने वयाच्या बालकाला परिसरातील बापू चव्हाण (वय 75) याने कालिका नगराजवळील निर्मनुष्य परिसरात नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच त्याची कोठेही वाच्चता करू नये म्हणून बालकाला धमकीही दिली. याप्रकरणी वृध्दावर भादंवि 377 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण सन 2012 चे अधिनियम कलम 4, 6, 8 12 सह अजाजअ प्रति. अधि. कलम 3 (1), (10), (2), (5), (5 अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषीकेश रेड्डी हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने उडवली दाणादाण

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner तालुक्यातील सावरगाव तळ (Savargav Tal) येथे बुधवारी (दि.2) दुपारी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावल्याने दाणादण उडाली. यामध्ये गहू (Wheat), कांदा...