Thursday, May 30, 2024
Homeजळगावदोनशे रुपयांची लाच, सहाय्यक अधीक्षक गजाआड

दोनशे रुपयांची लाच, सहाय्यक अधीक्षक गजाआड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

खावटीची रक्कम जमा करण्यासाठी तारीख वाढवून देण्यासाठी 200 रुपयांची लाच (bribe) मागणार्‍या कौटुंबिक न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक (Assistant Superintendent) हेमंत दत्तात्र्य बडगुजर (वय-57, रा. इंद्रप्रस्थनगर) यांना लाचलूचपत प्रतिबंधक (Anti-Corruption Department) विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अवघ्या दोनशेरुपयांसाठी झालेल्या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.

- Advertisement -

photos # हॉकर्स- फुले मार्केट व्यवसायिकांमध्ये वाद उफाळलाविद्यापीठ विकास मंचचा अधिसभेवर झेंडा

तक्रारदार व त्यांची पत्नी यांच्यामध्ये कौटूंबीक वाद होते म्हणून तक्रारदार यांनी पत्नी विरुद्ध कौंटुंबीक न्यायालयात पत्नीने त्यांच्याकडे नांदावयास यावे म्हणून दावा दाखल केला आहे. तसेच पत्नीने देखील तक्रारदार यांचे विरुद्ध त्याच कौटुंबीक न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणात कौटुंबीक न्यायलयाने तक्रारदार यांना 85 हजार रुपये एकरकमी खावटी रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. खावटीची एकरकमी रक्कम जमा करण्यासाठी तारीख वाढवून देण्याच्या मोबदल्यात कौटुंबिक न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक हेमंत बडगुजर यांनी दोनशे रुपयांची लाच मागितली होती.

सराईत गुन्हेगाराचा व्यापार्‍यासह तरूणावर प्राणघातक हल्लाBeauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा…

कॅन्टीजवळ कॅशघेतांना रंगेहाथ पकडले

शहरातील बी. जे. मार्केटमध्ये असलेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या वरच्या मजल्यावरील कॅन्टीजवळ तक्रारदाराकडून सहाय्यक अधीक्षक बडगुजर यांना लाच घेतांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप

या पथकाची कारवाई

ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मादर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सफौ दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोहेकॉ सुनिल पाटील, रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पोना बाळू मराठे, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, ईश्वर धनगर, पोकॉ प्रदिप पोळ, सचिन चाटे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या