Tuesday, May 28, 2024
Homeधुळेपिस्तुलाचा धाक दाखवत व्यावसायिकाला लुटले

पिस्तुलाचा धाक दाखवत व्यावसायिकाला लुटले

धुळे । प्रतिनिधी dhule

पिस्तुलचा धाक दाखवित वलवाडी शिवारातील मेडिकल व्यावसायिकाला लुटल्याचा प्रकार काल रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास तिखी फाट्यावर घडला. आठ हजारांची रोकड, पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकवला तसेच 15 हजार रूपये किंमतीची दुचाकी असा 28 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

- Advertisement -

प्रशांत सुरेश साळुंके रा.प्लॉट नं.36 अ/37 ब, आर्यनगर, वडेलरोड, वलवाडी शिवार, धुळे या मेडिकल व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.13 ऑगस्ट रोजी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास ते गरताड गावाच्या शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र.211 वरील चाळीसगाव ते धुळे रोडवरील तिखी फाट्याजवळून त्यांच्या होंडा युनिकॉर्न या दुचाकीने ( क्र. एमएच 06/ एव्ही 7993) जात होते. मागून येणार्‍या दुचाकीवरील तिघांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीनेे त्यांच्या उजव्या दंडावर धक्का मारीत त्यांना पाडले.

जमिनीवर पडल्यावर त्याने त्याच्या हातातील पिस्तुलचा धाक दाखवित आठ हजारांची रोकड, पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकवला तसेच 15 हजार रूपये किंमतीची दुचाकी घेवून पसार झाले. या फिर्यादीवरून मोहाडी पोलीस ठाण्यात तिघा चोरट्यांविरूध्द भादंवि 392,34 सह शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउनि.एस.एस. काळे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या