Thursday, March 27, 2025
Homeधुळेट्रकवर कार धडकली ; चालक ठार

ट्रकवर कार धडकली ; चालक ठार

धुळे । प्रतिनिधी dhule

सुरत-नागपूर महामार्गावरील धुळे तालुक्यातील भदाणे गावानजीक अचानक थांबलेल्या ट्रकवर मागून येणारी कार धडकली. त्यात कार चालक ठार झाला. बुधवारी रात्री हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन गोबा सरक (वय 32 रा. इच्छापुर ता. साक्री) असे मयत कार चालकाचे नाव आहे.

- Advertisement -

तो दि. 14 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एमएच 18 बीसी 0132 क्रमांकाची कारने जात होता. त्यादरम्यान पुढे धावणारा जीजे 26 टी 3658 क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने जात होता. भदाणे शिवारातील ज्योतीबा मंदिराजवळ ट्रक चालकाने अचानक गतिरोधक आल्याचे पाहुन जोरात ब्रेक मारले. त्यामुळे काही कळण्याच्या आतच कार ट्रकवर धडकली. त्यात कार चालक मोहन सरक यांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर ट्रक सोडून चालक पसार झाला.

याबाबत शिवा थोरात (रा. इच्छापुर) यांनी धुळे तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि ताटीकोंडलवर हे करीत

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ मार्च २०२५ – उभारी देणारा उपक्रम

0
कोणत्याही सरकारी व्यवस्थांवर-सेवांवर सामान्यतः टीकाच केली जाते. विशेषतः सार्वजनिक आरोग्यसेवेचा उल्लेख केला तरी असंख्य तक्रारींचा पाऊस पडल्याचे अनेकदा आढळते. तथापि ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा एक...