Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारमुख्याधिकार्‍यांना घेराव घातल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा

मुख्याधिकार्‍यांना घेराव घातल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार nandurbar। प्रतिनिधी

बेकायदेशिर जमाव (Illegal crowd) जमवून शासकीय कामात अडथळा (Obstruction in government work) निर्माण करुन पालिकेच्या (Municipality) मुख्याधिकार्‍यांना (Chief Executive Officer) घेराव घातल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नंदुरबार पोलीसांनी आणखी तीन बालविवाह रोखलेवाळूच्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.4 मे 2023 रोजी 11.45 ते 11.50 च्या दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह यांच्या कार्यालयात जावून दीपक सत्यवान बागले (रा. आकाश मोगरा कॉलनी नंदुरबार), विश्वजीत ऊर्फ बॉबी संजय बैसाणे (रा.समता कॉलनी नंदुरबार), आकाश रविंद्र अहिरे (रा.आंबेडकर चौक नंदुरबार), गोविंद सामुद्रे, गोडसे (पूर्ण नाव माहित नाही), पावबा भिखन आखाडे यांनी आरडाओरड केली.

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणकुसुंब्याचे शेतकरी कुणाल शिंदे यांच्या अनोख्या प्रयोगाची होतेय चर्चा..

तसेच पालिकेचे अभियंता गणेश गावित व साक्षीदार हे दि.5 मे 2023 रोजी 11.30 च्या सुमारास हे त्यांचे शासकीय कर्तव्य पार पाडीत असतांना यातील आरोपीत दिपक बागले, बॉबी बैसाणे, आकाश अहिरे, गोविंद सामुद्रे, गोडसे, पावबा आखाडे व इतर 2 ते 3 अनोळखी इसमांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करुन फिर्यादी व साक्षीदारांना घेराव घातला व तुमच्या मुख्याधिकार्‍यांना या ठिकाणी बोलवा तरच आम्ही येथुन जावू देवू अन्यथा आम्ही तुम्हाला येथुन जावू देणार नाही असे बोलले.

VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…

जेव्हा मुख्याधिकारी तेथे आले तेव्हा त्यांना देखील घेराव घातला व आरडाओरड करून शिवीगाळ केली म्हणुन गुन्हा. याबाबत गणेश गावित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रविण पाटील करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या