सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
तालुक्यातील दातली येथील सागर मारुती भाबड (34) याच्या खूनाच्या गुन्ह्यात भाऊबंदातील 27 जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी (दि.14) मागील भांडणाची कुरापत काढून जगन्नाथ नरहरी भाबड (50), अक्षय म्हाळू भाबड (28), म्हाळू नरहरी भाबड (53), संकेत म्हाळु भाबड (22), कांताबाई नवनाथ कांगने, रखमाबाई म्हाळू भाबड सर्व रा. दातली, ता. सिन्नर आणि ओमकार विजय डोमाडे (21) रा. देशवंडी, ता. सिन्नर यांना दगड, लाठ्या-काठ्या, लोखंडी गज, कोयत्याने मारहाण गंभीर जखमी करण्यात आले होते. तर सागरच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालून लाठ्या-काठ्या, कोयते, गज, कुऱ्हाड अशा हत्यारांनी डो्नयावर, तोंडावर मारुन त्याला ठार केले होते. तर सागरच्या क्रेटा गाडीच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले होते.
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक आादित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पालवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुर्वे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांनी भेट दिली होती. मयत सागर याचा भाऊ संदीप भाबड याने दिलेल्या फिर्यादीरुन कारभारी नामदेव भाबड, श्रीरंग तुकाराम भाबड, राहूल श्रीरंग भाबड, छबाबाई सोमनाथ भाबड, बबाबाई शिवराम भाबड, सरसाबाई रखमा भाबड, सुमन श्रीरंग भाबड, अनिता कारभारी भाबड, स्वाती कारभारी भाबड, कौसाबाई नामदेव भाबड, दिव्या गोरख भाबड, चंद्रभान आव्हाड, संदिप दत्तू केदार, यशोदा गोरख भाबड, शितल मिनानाथ भाबड, हर्षला गणेश भाबड ताई अनिल भाबड, रोशन कारभारी भाबड, भूषण भाबड सर्व रा. दातली या 27 जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यापैकी मीनानाथ सोमनाथ भाबड (34), सोमनाथ भागूजी भाबड (70), गोरखनाथ सोमनाथ भाबड (45), अनिल रखमा भाबड (33), सूरज गोरखनाथ भाबड (21), शिवराम भागूजी भाबड (76), गणेश रखमा भाबड (32), निखील श्रीरंग भाबड (30) सर्व रा. दातली ता. सिन्नर या संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
आज (दि.15) दुपारी या सर्व संशयितांना सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मयत सागर भाबड याच्या मृतदेहाचे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील अधिक तपास करीत आहेत.