Saturday, May 4, 2024
Homeनगरविवाहितेच्या विनयभंगप्रकरणी राहुरीत तरूणावर गुन्हा दाखल

विवाहितेच्या विनयभंगप्रकरणी राहुरीत तरूणावर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

घराकडे जात असलेल्या 21 वर्षीय विवाहित तरूणीला (Married Woman) लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) माहेगाव (Mahegav) येथे दि.10 मार्च रोजी घडली. याबाबत सचिन चव्हाण याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील एक 21 वर्षीय विवाहित तरूणी दि. 10 मार्च रोजी सहा वाजे दरम्यान बाथरूमला गेली होती. ती घराकडे परत येत असताना आरोपी तिच्या पाठीमागून आला. त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करु लागला. तेव्हा त्या तरूणीने जोरात आरडाओरड केली. तेव्हा तिचा पती तेथे पळत आला. त्याला येत असल्याचे पाहून आरोपीने त्या तरूणीला खाली पाडून तिच्या अंगावर पाय देऊन तेथून पळून गेला. घटनेनंतर त्या तरूणीने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

तिच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन चव्हाण, रा. शेनवडगाव, ता. राहुरी याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक महेश भवार हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या