Saturday, July 27, 2024
Homeनाशिकदेवगाव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

देवगाव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

शिरवाडे वाकद | प्रतिनिधी

देवगाव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तब्बल ३५ लाखांचा अपहार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

राजेंद्र विश्वनाथ गुरव, द्वारका नाशिक हे संस्थेच्या अधिकृत व्यवस्थापक पदावर असतांना दि.१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ आणि १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या काळात संस्थेतील विविध सभासदांची जमा असलेली रक्कम आय.डी.बी.आय बँकेतुन बनावट चेकद्वारे तसेच रोख स्वरुपात असा एकुण ३५,७८,०४३.०० रुपयाची रक्कम परस्पर संस्थेचा विश्वासघात करत अपहार करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खोटा दस्तावेज तयार करुन, संस्थेस खोटा हिशोब देवुन, संस्थेची आर्थिक फसवणुक करुन संस्थेस बनावट दस्तावेज खरा म्हणुन भासवुन संस्थेची आर्थिक फसवणुक केली म्हणुन सुनिल चंद्रकांत जडे वय ४६ वर्षे धंदा – नोकरी प्रमाणित लेखापरिक्षक सहकारी संस्था नाशिक रा.शांतीनगर निफाड यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पो.ठाणे सी.सी.टि.एन.एस.क्र.२७२/२०२३ भादवी का. क. ४२०, ४६५, ४६८, ४७१,४७७ (अ). ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी लासलगावचे स.पो.नि.राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ऊ.नि. प्रवीण उदे, पो.ना.संदीप शिंदे, पो.ना.औदुंबर मुरडनर हे तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या