Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्याच्या कोंढव्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; संशयितावर गुन्हा दाखल

पुण्याच्या कोंढव्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; संशयितावर गुन्हा दाखल

पुणे |प्रतिनिधी

कोंढव्यात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शाळेचा सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍यासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

अकबर नदाफ आणि तवकीर बिनतोडे (वय 25) (दोघेही रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत रोहीत कमलाकर शिंदे (31, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nashik News : चांदवड टोलनाक्यावर कर्मचाऱ्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; गुन्हा दाखल

दाखल गुन्ह्यानुसार फिर्यादी शिंदे हे कोंढवा बुद्रुक येथील लक्ष्मीनगर येथील गल्ली नंबर ६ येथे राहण्यस आहेत. त्याच्या येथेच इकरा नावाची इंग्लीश हायस्कुल आहे. तेथे पहिली ते दहावी पर्यंत वर्ग चालतात. इयत्ता १२ वी पर्यंत शाळा आहे.शाळेमध्ये परिसरातील मुले व मुली शिक्षण घेत आहेत. दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास शिंदे हे त्याच्या घरात असताना त्यांना पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा ऐकु आल्या.

त्यांनी लागलीच घराबाहेर येऊन पाहिले असता इकरा शाळेचा सुरक्षा रक्षक अकबर नदाफ आणि त्यांच्याच घरासमोर राहणारा तवकीर बिनतोडे या दोघांना पुन्हा पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचे त्यांना दिसले. याबाबत शाळेचे प्राचार्य यांना भेटुन रात्री घडलेलया प्रकाराबद्दल सांगितले. दरम्यान प्राचार्यांनी देखील सुरक्षा रक्षकाविरोधात यापूर्वी दोन ते तीन वेळा तक्रारी आल्या आहेत, आम्ही त्याला शाळेतून काढून टाकणार आहे, असे प्राचार्यांनी शिंदे यांना सांगितले.

शरद पवारांना ऑफर देण्याबद्दल राष्ट्रवादी नेत्याचे वडेट्टीवारांना उत्तर; म्हणाले…

दरम्यान फिर्यादी शिंदे व त्यांच्या सोबत विठ्ठल पंधरकर, भरत नलगे, आदित्य माने व किशोर नलगे यांनी नदाफला तु काल पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा का दिल्या ? असा जाब विचारला असता त्यावेळी तवकीर बिनतोडे हा देखील तेथे आला त्यावेळेत त्या दोघांकडे देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल जाब विचारला. याच वेळी कोंढवा परिसरातील स्थानिक कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले. पाकिस्तान जिंदाबद अशा देशविरोधी घोषणा का दिल्या याचा जाब त्यांनीही विचारला.

त्यानंतर काही वेळातच कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे, गुन्हे निरीक्षक संदीप भोसले यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा देशविरोधी घोषणा सार्वजनिक रित्या देउन त्यामुळे दोन धर्मांमध्ये तेढ निमाण होऊन जाती दंगा होऊ शकतो याची जाणीव असताना देखील घोषणा दिल्या.

याप्रकरणी दोघांवरही भादवि कलम १५३, १५३(ए) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या सर्व विषयाबाबत वरिष्ठ निरीक्षक सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या