Saturday, July 27, 2024
Homeनाशिकपरिचारिकेला मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

परिचारिकेला मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) गर्दी करणाऱ्या व्यक्तींना बाहेर जाण्यास सांगितल्याने त्याचा राग धरून रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करत परिचारिकेसह मावशीला मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली होती….

- Advertisement -

सिव्हिल हॉस्पिटल फीमेल मेडिसिन वॉर्ड (Medicine Ward) येथे ही घटना घडली होती. परिचारिकेला मारहाण झाल्याने या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा रुग्णालयातील सेवकांनी काही वेळ काम बंद आंदोलन पुकारले होते.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. दरम्यान मारहाण ( beating) करणाऱ्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसबा पोटनिवडणुकीत चर्चेत असलेल्या बिचुकले आणि दवे यांना किती मतं पडली?

प्रिया आशीष गवई (Priya Ashish Gavai) (वय 35) व आशिष गवई (वय 40, दोन्ही रा. नवीन नाशिक) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा ( crime) दाखल करण्यात आला आहे. या आंदोलनावेळी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी देखील करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक (Surgeon) यांच्याकडून योग्य त्या पाठपुराव्याचे आश्वासन मिळाल्यानंतर काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

चिंचवडचा गड भाजपने राखला; अश्विनी जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने विजय

लीना पुष्कर जाधव (Leena Pushkar Jadhav) (रा. नाशिक रोड) यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. जिल्हा रुग्णालयात सतत परिचारिका तसेच डॉक्टर, सेवकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यातच बुधवारी सकाळी साफसफाई सुरू होती, तसेच डॉक्टरांचा देखील राऊंड होता त्यामुळे रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना परिचारिकेने बाहेर जाण्यासाठी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्याचा राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करून काही वेळानंतर अचानक परिचारिकेवर हल्ला केला. त्यामध्ये मावशी आल्याने मावशीला देखील मारहाण करण्यात आली. रुग्णालयात वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे जिल्हा रुग्णालयात काम करणे शक्य नसल्याने जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या