Tuesday, April 29, 2025
Homeनंदुरबार...अन तरुणीसह दोघांवर दाखल झाला गुन्हा

…अन तरुणीसह दोघांवर दाखल झाला गुन्हा

नंदुरबार Nandurbar । वार्ताहर-

प्रेमसंबंध (love affair) तोडल्याने तरुणाला (young man) आत्महत्येस (suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीसह (young woman) दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे. याबाबत मयत तरुणाने सुसाईड नोटमध्ये त्याच्या प्रेमसंबंधाचा उल्लेख केला आहे.

- Advertisement -

बारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील जोशीपुरा भागात राहणार्‍या 22 वर्षीय तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांची एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा होती. परंतू मुलीच्या आईला एकाने भडकवल्याने दोघांचे प्रेमसंबंध तुटले. या कारणावरुन संंबंधीत तरुणाने शहादा येथील जोशीपुरा भागातील आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

लेवा गुजर समाजाची विवाहासाठीची ही आचारसंहिता वाचली का ?

मयत तरुणाने आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. दि. 1 मार्च रोजी 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मयत तरुणाच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधीत तरुणीसह दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 306, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार;...

0
मुंबई | Mumbai राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...