Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारात महिलेच्या गळयातून दहा तोळयांची मंगलपोत लंपास

नंदुरबारात महिलेच्या गळयातून दहा तोळयांची मंगलपोत लंपास

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

शहरातील गिरीविहार सोसायटीजवळ महिलेच्या गळयातून अज्ञात इसमाने 3 लाख 30 हजार रुपये किमतीची 10 तोळयांची मंगलपोत जबरीने ओढून नेल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, दि.22 जून रोजी सायंकाळी रत्नाबाई प्रभाकर चौधरी (रा.गिरीविहार सोसायटी, नंदुरबार) या नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराच्या बाहेर पडले व फिरुन परत घरी जात असतांना संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास घराचे पुढे राहणारे गिरीष काशिनाथ पटेल यांच्या घरासमोर रोडवर समोरुन आलेल्या काळया रंगाच्या मोटारसायकल वरील तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या जवळ येवुन मागे बसलेल्या निळया रंगाचे शर्ट व निळया रंगाची पॅन्ट घातलेल्या इसमाने सौ.चौधरी यांच्या गळयातील 3 लाख 30 हजार रुपये किमतीची 10 तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत जबरीने ओढुन करण चौफुलीकडे पळुन गेले. याबाबत रत्नाबाई चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या