Saturday, May 4, 2024
Homeजळगावजंगलात नेऊन महिलेवर अत्याचार करत बनवला व्हिडीओ ; भावासह मुलाला मारून टाकण्याची...

जंगलात नेऊन महिलेवर अत्याचार करत बनवला व्हिडीओ ; भावासह मुलाला मारून टाकण्याची दिली धमकी

पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा – वार्ताहर pachora

महिलेला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून शेतात नेत तोंडात बोळा कोंबून अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर नराधमाने अत्याचार केल्याचा (video) व्हिडीओ देखील बनविला असल्याची तक्रार पिडीत महिलेने दिली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Hareshwar Police Thane) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, (pachora) पाचोरा तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला तिचा भाऊ व मुलासह वास्तव्याला आहे.

दि.५ जून रोजी रात्री ९ वाजता महिला घरी एकटी असतांना संशयित आरोपी आबा अंबादास कोळी रा.घोसला ता.सोयगाव जि.औरंगाबाद (Soygaon Dist. Aurangabad) हा दुचाकीवर येवून तुला तुझ्या बहिणीच्या घरी सोडतो असे सांगितले.

याला नकार दिल्याने शिवीगाळ करून तुझ्या भावासह मुलाला मारून टाकण्याची धमकी देत तिला दुचाकीवर जबरी बसवून घेवून गेला. संशयित आरोपीने सोयगाव शिवरात शेतात नेवून तोंडात कापडाचा बोळा कोंबून अत्याचार केला. एवढेच नाही तर अत्याचाराचा व्हिडीओ देखील बनविला.

याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आबा आंबादास कोळी याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास (API Mahendra Waghmare) सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या