Sunday, September 8, 2024
Homeक्राईमNashik Crime News : स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण करुन परतताच तडिपाराची जंगी मिरवणूक;...

Nashik Crime News : स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण करुन परतताच तडिपाराची जंगी मिरवणूक; गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तडीपारी करुनही वर्तनात सुधारणा न झाल्याने वर्षभर तुरुंगात स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण केलेल्या सराईत गुंडाने जेलमधून (Jail) बाहेर येताच तडिपार मित्रांसह जंगी मिरवणूक काढत आनंदाेत्सव साजरा केला. ही घटना शरणपूर भागात (Sharnpur Area) मंगळवारी (दि. २३) दुपारी घडली. दरम्यान, या घटनेने परिसरात दहशत व भिती पसरल्याने नागरिक भयभीत झाले. यानंतर सरकारवाडा पाेलीसांना या प्रकाराची माहिती कळताच त्यांनी तपास करुन दुसऱ्या दिवशी सराईतांच्या टाेळक्यातील १५ जणांवर गुन्हा नाेंदविला आहे. 

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षद सुनील पाटणकर (वय २६, रा. बेथेलनगर, शरणपूर राेड) असे सराईताचे नाव असून जुलै २०२३ मध्ये पाेलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्याच्या गुन्हेगारी वर्तणूक व कारवायांमुळे त्याला एमपीडीए (झाेपडपट्टी दादा) कायद्यान्वये एक वर्षांसाठी सेंट्रल जेलमध्ये स्थानबद्ध केले हाेते. यापूर्वी पाटणकरला तडिपार देखिल करण्यात आले हाेते. त्यानंतर एमपीआयडीची कारवाई (MPID Action) करण्यात आल्यावर ताे जेलमध्ये हाेता.

हे देखील वाचा : Nashik Fraud News : निवृत्त महिला ब्रिगेडिअरचे दीड काेटी लांबविले

यानंतर वर्षभराच्या स्थानबद्धतेचा कालावधी संपवून २३ जुलै २०२४ राेजी ताे जेलमधून बाहेर आला. तेव्हा त्याचे समर्थक व काही तडिपार मित्र संशयित गोपाल नागोरकर, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबिन्सन बत्तीसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळगे(सर्व रा. बेथेल नगर, शरणपूर) जेलजवळ त्याच्या स्वागतासाठी जमले. त्यानंतर टाेळक्याचा कार व दुचाकींचा ताफा धुमधडाक्यात मंगळवारी दुपारी तीन वाजता शरणपूर भागात पाहाेचला. यावेळी तडिपार संशयित गाेपाल नागाेरकर व वेदांत चाळगे यांच्यासह इतर साथीदारांनी या भागातून जल्लाेषात विजयी मिरवणूक काढली.

एखादा उमेदवार जेव्हा अत्युच्च कामगिरी करुन आकाशाला गवसणी घालताे, तेव्हा त्याची जशी मिरवणूक काढली जाते, त्यापेक्षाही ‘भारी’ मिरवणूक सराईत पाटणकरची काढण्यात आली. एक्सयुव्ही ३०० (एमएच १५ जीएक्स ८७२१) या महागड्या कारमध्ये पाटणकरला बसवून बेथेल नगर ते आंबेडकर चाैक आणि साधुवासवानी राेड भागातून फिरवण्यात आले. तेव्हा त्याच्या आजूबाजूला इतर कार व १० ते १५ स्पाेर्ट बाईक, इतर दुचाकी व माेपेडस्वार साथीदार मिरवणुकीत सहभागी झाले.

हे देखील वाचा : नाशिक जिल्हा झाला १५५ वर्षांचा; गौरवशाली क्षणांचा प्रशासनाला पडला विसर

दरम्यान, या सर्वांनी परिसरात गाेंगाट करुन अर्वाच्य भाषा वापरुन शिवीगाळ केली. शिवाय येथेच्छ राडा मांडून दुचाकी वाहनांचे कर्णकर्कश हाॅर्न वाजवून दहशत निर्माण केली. त्यानुसार, सरकारवाडा पाेलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक सुधीर पाटील यांनी बीएनएस कलम १८९(२), २२३ व मपाेका कायद्यान्वये फिर्याद नाेंदविली आहे. त्यानुसार टाेळीतील वरील संशयित व दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पाेलीस नाईक नितीन थेटे करत आहेत. 

अर्वाच्य भाषेत धमकी काेणाला

या टाेळक्याने मिरवणूक काढतानाच परिसरात एक विशिष्ट व्यक्तिविशेषावरुन अर्वाच्य घाेषणाबाजी केली. ही घाेषणाबाजी पाटणकरच्या विराेधी गटासाठी हाेती असे समजते. तर संशयितांवर पाेलीस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यासह बेकायदेशिर जमाव जमविणे, मिरवणूक काढणे व दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पाटणकर, चाळगे व नागाेरकर यांच्यावर यापूर्वी जबर दुखापत, चोरी, घरफोडी, शिवीगाळ व दमदाटी, खुनाचा प्रयत्न, गावठी कट्टे बाळगणे आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या