Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Crime News : तीन मुलांना विहिरीत ढकलून खुनाचा प्रयत्न

Nashik Crime News : तीन मुलांना विहिरीत ढकलून खुनाचा प्रयत्न

तिघांविरोधात गुन्हा दाखल, एकास अटक

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील वडगाव पिंगळा (Vadgaon Pingala) येथील तीन लहान मुलांना विहिरीत ढकलून देत त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच घडल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने विहिरीत पडलेली तिनही मुले बचावल्याने घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एकास अटक करण्यात आली आहे. अमोल रामनाथ लांडगे (३०) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : परिवहन आयुक्तांसोबत आरटीओ कर्मचारी संघटनेची चर्चा फिस्कटली

वडगाव-पिंगळा येथे नाशिक कारखाना (Nashik Factory) रस्त्यावर अमोल रामनाथ लांडगे आणि संतोष घुगे हे वास्तव्यास आहेत. बुधवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वरद संतोष घुगे (१३), अथर्व संतोष घुगे (९) आणि त्यांचा मित्र आदित्य सानप (१३) ही तीन मुले अंगणात खेळत असताना अमोल लांडगे याने जवळ असलेल्या विहिरीजवळ उभ्या असलेल्या दोघांकडून कासव घेऊन येण्याचे वरद व अथर्व यांना सांगितले. घुगे भावंडे विहिरीकडे गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आदित्य सानप हा ही तेथे पोहचला. तेथे उभ्या असलेल्या विक्रम नारायण माळी आणि साईनाथ वाजी ठमके दोघे रा. वडगाव पिंगळा या दोघांनी या मुलांना विहिरीत कासव असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा :  ‘देशदूत’च्या यशस्वी उद्योजक पुरस्कारांचे वितरण

कासव बघण्यासाठी ही मुले नाना भाऊ सानप यांच्या आठ परस खोल असलेल्या विहिरीत (Well) डोकावत असतानाच पाठीमागे उभ्या असलेल्या दोघांनी त्यांना विहिरीत ढकलून देत तेथून पळ काढला. मात्र, विहिरीत विद्युतपंप, पाईप, केबल यांना बांधलेल्या दोरखंडाचे जाळे असल्याने वरच्या हातात एक दोरखंड लागला. त्यामुळे दोरखंडाला धरुन स्वतःचा जीव वाचवत इतर दोघांनाही त्याने विहिरीबाहेर काढले. त्यानंतर मुले कपडे बदलून झोपी गेली. वरद व अथर्वचे आईवडील संतोष घुगे व दिपाली घुगे यांचे शिंदे येथे महा ई सेवा केंद्र असल्याने रात्री उशिरा ते घरी परतले.तोपर्यंत दोन्ही मुले झोपी गेली होती.

हे देखील वाचा : ‘देशदूत’च्या लिगल नोटीस पोर्टलचे अनावरण

मात्र, शेजारी राहणाऱ्या आदित्यने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर आदित्यच्या आईने घुगे यांच्या घरी येत त्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले.त्यानंतर मुख्य संशयित अमोल लांडगे याला जाब विचारण्यात आला तर विहिरीत लोटणारे दोघे गावातून फरार झाले होते. गुरुवारी सकाळी घुगे आणि सानप कुटुंबाने एकत्र येऊन पोलीस पाटील सागर मुठाळ यांच्यामार्फत संबंधित घटना सिन्नर पोलिसांपर्यंत (Sinnar Police) पोहचवली. यासंदर्भात मुलांची आई दिपाली संतोष घुगे हिच्या फिर्यादीवरुन लांडगे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दोघे फरार संशयितांचा शोध सुरु आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या