Saturday, April 26, 2025
Homeक्राईमNashik News : मतदान करतानाचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी तरुण मतदारावर गुन्हा दाखल

Nashik News : मतदान करतानाचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी तरुण मतदारावर गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनाई असूनही मतदान कक्षात (Polling Booth) मोबाइल नेत मतदान करतानाचा व्हिडिओ करुन व्हायरल करणे तरुणाच्या अंगलट आले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) संबंधित तरुणावर गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, सीडीओ मेरी हायस्कूल येथील १२३/७७ क्रमांकाच्या मतदान केंद्रात हा प्रकार घडला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Igatpuri News : मुंढेगावजवळ विहिरीत आढळला मायलेकींचा मृतदेह

मतदान केंद्रावरील कर्मचारी विजय जगन्नाथ महाजन (रा. नाशिक) यांनी पोलिसांत (Police) फिर्याद दिली. त्यानुसार अथर्व राम खांदवे (वय २१, रा. तालवालानगर) या संशयिताविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खांदवे हा सोमवारी (दि. २०) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मतदान केंद्रांवर पोहोचला. त्यावेळी पोलिसांनी मोबाईल नेण्यास सक्त मनाई असल्याची सूचना केली. मात्र, त्याने सूचनेकडे दुर्लक्ष करुन छुप्यारितीने मोबाईल मतदान कक्षात नेला. यासह मतदान करताना ‘इव्हीएम’ (EVM) शेजारी कांदा (Onion) ठेवून खांदवे याने व्हिडिओ तयार केला.

हे देखील वाचा : Nashik News : महिनाभरात दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

तसेच हा व्हिडिओ त्याने व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी खांदवेचा शोध घेतला. यानंतर त्याच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिराने गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, पहिल्या ते चौथ्या टप्प्यातील मतदानावेळीही असे प्रकार महाराष्ट्रात घडले होते. त्यामुळे पाचव्या टप्प्यात नाशिक व दिंडोरी मतदारसंघात (Nashik and Dindori Loksabha) मतदान केंद्रांवर मोबाइल नेण्यास मनाई करण्यात आली. तरीही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन मतदारांनी व्हिडिओ तयार करुन एकप्रकारे मतदान उघड केल्याचा प्रत्यय आला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पेठरोडला चार ते पाच वाहनांची तोडफोड

इतर व्हिडिओंचाही तपास

कांदा ठेवून मतदान, टोमॅटो ठेवून मतदान करण्यासह नियमित मतदानाचेही व्हिडिओ नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात व्हायरल होत आहे. काही युजर्सने त्यासंदर्भात इन्स्टाग्रामवर ‘स्टोरी’ अपलोड केल्या आहेत. नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दलातील सायबर पथक संबंधित मतदारांचा शोध घेत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्धही मतदान केंद्रातील गैरवर्तन आणि नियमभंगाचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack: भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; सलग दुसऱ्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने उचललेल्‍या कडक पावलामुळे पाकिस्‍तानची झोप उडाली आहे. पाकिस्‍तानच्या सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन केले...