Friday, May 16, 2025
HomeUncategorizedआदर्श घोटाळा : मानकापे झाला जेरबंद

आदर्श घोटाळा : मानकापे झाला जेरबंद

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

तब्बल दोन अब्ज रुपयांचा घोटाळा करणारा अंबादास मानकापे जेरबंद झाला असून अन्य संचालकांनाही अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो अटकपूर्व जामीनासाठी वकिलाला भेटायला येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला उचलले.  

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल २०२ कोटी २४ लाख ६३ हजार ९६० रुपयांचे नियमबाह्य कर्ज वाटप केल्याप्रकरणी अंबादास मानकापे याच्यासह संचालक मंडळ आणि विविध शाखांच्या व्यवस्थापकांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. मानकापे यांच्यासह संचालक मंडळाला अटक न केल्यास १७ जुलै रोजी ठेवीदारांचा मोर्चा काढण्याचा इशारा खा. इम्तियाज जलील यांनी दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापेला गोलवाडी फाटा भागातून अटक केली.

आदर्श पतसंस्थेत २०१६ ते २०१९ आणि २०१८ ते २०२२ या कालावधीतील कर्ज प्रकरणांमध्ये २०२ कोटी २४ लाख ६३ हजार ९६० रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी अध्यक्षांसह ५९ जणांविरुद्ध सिडको ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. तारण कमी अन्‌ कर्ज जास्त, कागदपत्रे अपूर्ण असे प्रकार लेखापरीक्षण चाचणीत समोर आल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रकरणात विशेष लेखापरीक्षक धनंजय चव्हाण आणि सुधाकर गायके हे दोघे फिर्यादी आहेत. चव्हाण यांनी २०१६ ते २०१९ आणि गायके यांनी

२०१८ ते २०२२ या कालावधीचे लेखापरीक्षण केले आहे. या कालावधीत आरोपींनी कट रचून २३ कर्जदारांना ९१ कोटी ७९ लाख ४४ हजार ६४ रुपयांचे विनातारण कॅश क्रेडिट कर्ज वाटप केले. संचालक मंडळाने अपहार करण्याच्या उद्देशाने हा गैरव्यवहार केला. तसेच सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मानकापे शुक्रवारी सायंकाळी गोलवाडी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून या भागात सापळा लावण्यात आला. मानकापेची गाडी येताच पोलिसांनी छापा मारून अटक केली. मानकापेला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. संचालक मंडळातील इतर सदस्यांचा कसून शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दली.

आरोपींची नावे- पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास आबाजी मानकापे, संचालक महेंद्र जगदीश देशमुख, अशोक नारायण काकडे, काकासाहेब लिंबाजी काकडे, भाऊसाहेब मल्हारराव मोगल, त्रिंबक शेषराव पठाडे, रामसिंग मानसिंग जाधव, गणेश ताराचंद दौलनपुरे, ललिता रमेश मून, सपना संजय निर्मळ, अनिल अंबादास पाटील, प्रमिलाबाई माणिकलाल जैस्वाल, पंडित बाजीराव कवटे, संबंधित शाखाप्रमुख, कर्ज विभागप्रमुख यांच्यासह इतरांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वादळी पावसात पत्र्याचे शेड कोसळले; एक जण जखमी

0
  येवला| प्रतिनिधी Yeola शहर व परिसरात आजही, गुरुवारी (दि. १५) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने शहरातील गंगा दरवाजा भागात पत्र्याचे शेड...