Wednesday, April 2, 2025
Homeधुळेवृध्द महिलेने घेतला चोरट्याला चावा

वृध्द महिलेने घेतला चोरट्याला चावा

धुळे । प्रतिनिधी dhule

चोरट्याला प्रतिकार करतांना वृध्द महिलेने चोरट्याच्या बोटाला चावा घेतला मात्र त्या अपयशी ठरल्या. अखेर महिलेच्या गळ्यातील सोनपोत दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यापैकी एकाने धूमस्टाईल ओरबाडत पोबारा केला. याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

याबाबत शुभांगी उदय पुराणिक (60) रा.नाशिक, ह.मु.इच्छापुर्ती गणपती मंदिराजवळ, धुळे या वृध्देने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.11 जुलै रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास त्या गणपती मंदिराजवळ आल्या असता मागावून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडून पळून गेले. यावेळी सदर महिलेने प्रतिकार करतांना चोरट्याच्या बोटाला चावा घेतला मात्र त्या अपयशी ठरल्या. या फिर्यादीवरून देवपूर पोलीस स्टेशन येथे दोघा अनोळखी चोरट्यांवर भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि. संगिता राऊत या करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत...

0
नाशिक | Nashik एकीकडे उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असताना दुसरीकडे काहीसा गारवा देखील जाणवू लागला आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक शहरासह (Nashik...