मुंबई –
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्यापैकी अनेक कार प्रेमींना आपल्या कारमधून लॉंग ड्राईव्ह सारख्या अनेक गोष्टींना मुकावे लागत आहे. तसेच कारमध्ये सोशल डिस्टंसिंगसाठी मर्यादित प्रवासी असण्याची बंदी घालण्यात आल्यामुळे जर तुम्ही मोठी कार घेण्याच्या विचारात असाल तर थोडे दिवस थांबा, असा सल्ला आम्ही तुम्ही नक्की देऊ, कारण टोयोटा कंपनीच्या इनोव्हा क्रिस्टाचे सीएनजी व्हेरियंट असलेली नवी गाडी भारतात लवकरच लॉंच होणार आहे. या गाडीची अनेक इनोव्हा प्रेमी आतुरतेने वाट पाहात आहे. ही गाडी भारतात २०२० वर्षात तिसर्या टप्प्यात लॉंच होऊ शकते.
जुलै ते सप्टेंबर दरम्यान सीएनजी असलेली इनोव्हा क्रिस्टा ही गाडी भारतात लॉंच होऊ शकते. ही कार पेट्रोल व्हेरियंटपेक्षा १ लाखांनी महाग असू शकते. या गाडीच्या किंमतीबाबत या कंपनीने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हे सीएनजी मॉडल लेव्हल उ ट्रिमवर आधरित असू शकते. मार्चमध्ये लॉंच झालेल्या इनोवा स्पेशल एडिशनविषयी बोलायचे झाले तर, यात अतिरिक्त क्रोम गार्निश, कारच्या चारही बाजूंना लीडरशीप के बेज, १७ इंचाची नवी ब्लॅक अलॉय वील्ज, रिअर स्पॉयलर आणि साइट स्कर्टस दिले गेले आहेत. याला ड्यूल टोन कलर ऑॅप्शन देण्यात आले होते. इनोवाच्या याआधी भारतात लॉंच झालेल्या कारपेक्षा जास्त काय या कारमध्ये वेगळे असणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. सीएनजी व्यतिरिक्त यात आणखी काय वेगळेपण पाहायला मिळणार याचीही सर्वजण वाट पाहत आहेत.