Saturday, April 26, 2025
Homeमनोरंजनऊसतोड मजूर दाम्पत्याचा रिल्स होतोय फेमस

ऊसतोड मजूर दाम्पत्याचा रिल्स होतोय फेमस

नाशिक | Nashik

गरीब, शेतमजूर, ऊसतोड करणारा कामगारवर्ग (worker) नेहमी आपल्या रोजच्या प्राईम टाईम चर्चांपासून कोसो दूर असतो. त्याचं कष्टमय जगणं कोणाच्याही खिसगणतीत नसतं, पण आज या वर्गातील जगणाऱ्या लोकांचे वास्तव सहज सोप्या माध्यमातून समोर आणलंय एका रील्सने (reels).

- Advertisement -

सध्या समाजमाध्यमात एक रील्स व्हायरल होत आहे, यात एक गरिब कष्टकरी, ऊसतोड मजूर दाम्पत्य आपल्या कष्टाच्या, हक्काच्या ऊसाच्या बैलगाडीवर बसुन रोजच्या कष्टाच्या वेदनांचा विसर पाडून, जगण्याचा उत्सव करतानाचा दिसत आहे.

वरवरच्या भपकेबाज झगमगाटात रमण्यापेक्षा, “नको ऐशआरामासाठी मोठ्यांची चाकरी, बरी आपली कष्टाची भाकरी” या म्हणीप्रमाणे आपल्या दिवसभरातील कष्टाच्या असंख्य वेदनांना मूठमाती देत या रिल्समध्ये त्यांनी व्यक्त केलेला हा आनंद खरोखरच अवर्णनीय असाच आहे.

खरंतर अशा कित्येक लोकांचा जीवनगाडा कष्टाच्या ओझ्याखाली कायमस्वरूपी दबलेला असतो, त्या जगण्यात आनंद शोधणारा निराळाच आणि त्यातून इतरांनाही जगण्याची प्रेरणा देणारा विरळाच, अशी सकारात्मक व्यक्तिमत्व त्यांच्या लहान-लहान कृतींमधून खूप सारा संदेश देऊन टाकतात, अशा लोकांचे कौतुक करावे ते थोडेच.

त्या रील्स मधून ऊसतोड मजूर दाम्पत्याने लक्ष वेढल आहे त्यांच्या वास्तविक जीवनाकडे, तरीही त्यांच्यात असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेकडे हा संदेश आजच्या ताणतणावात राहण्याऱ्या युवा पिढीला जगण्याविषयी नक्कीच सकारात्मक दृष्टीकोन देतो. हे या रील्स खास वैशिष्ट्ये.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...