Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारचांदसैली घाटात दरड कोसळली ; वाहतुक ठप्प

चांदसैली घाटात दरड कोसळली ; वाहतुक ठप्प

नंदूरबार l प्रतिनिधी nandurbar

गेल्या अनेक दिवसांपासून धडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून, नदी (river) नाल्यांना पूर आला आहे, त्यातच तालुक्याला नंदूरबार (nandurbar) जिल्ह्याशी जोडणारा चांदसैली घाट (Chandsaili Ghat) हा महत्वाचा समजला जातो, मात्र मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाने घाटाची पूर्ण वाट लावली असून सातमाळ वळनावर दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.

- Advertisement -

यामुळे शहादा (shahada) मार्गे प्रवास करून 40 किलोमीटरचा फेरा पडत आहे. बांधकाम विभागमात्र (Construction Department) झोपेचे सोंग घेऊन साफ दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. चांदसैली घाट हा तालुक्यातील महत्वाचा रस्ता मानला जातो. कमी वेळेत नंदुरबार जाता येत असल्याने वाहनधारकांचा पसंतीचा रस्ता आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घाटात दरड कोसळत आहे. यात बऱ्याचदा वाहचालक शासकीय यंत्रनेची वाट न बघता स्वतः पुढाकार घेऊन वाट मोकळी करत असतात. मात्र, रविवारी दरड कोसळून संपूर्ण रस्ता बंद झाला. यामुळे रस्ता वाहतूकसाठी बंद झाल्याने घाटात दरी कोसळल्यामुळे आता वाट कुठून काढायची असा प्रश्न आता वाहनधारकांना पडला आहे.

या घाटात नेहमी दरड ही कोसळत असते मात्र बांधकाम विभाग कोणतीही उपाययोजना करत नसून पूर्णपणे डोळेझाक करत आहे. बांधकाम विभागाच्या हलगर्जी पणाचा फटका वाहनधारकांना बसत असून, चालीस किलोमीटरचा फेरा घेत शहादा मार्गे नंदुरबारला जावे लागत आहे. लवकरात लवकर घाटातील कोसळलेली तरी साफ करत रस्ता सुरळीत करावा अशी मागणी वाहनधारक करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या