Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारमदयाची वाहतुक करणाऱ्या कंटेनरसह सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त

मदयाची वाहतुक करणाऱ्या कंटेनरसह सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त

नंदूरबार l Nandurbar प्रतिनिधी

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने नंदुरबार तालुक्यातील न्याहली (Nyahli) शिवारात परराज्यातील मदयाची वाहतुक करतांना दहा चाकी कंटेनरसह (container) १ कोटी १४ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १३ जून रोजी कांतीलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, सुनिल चव्हाण संचालक (अं व द) राज्य उत्पादन शुल्क, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, सी.बी. राजपुत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे, युवराज राठोड अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार

दोंडाईचा ते नंदुरबार रस्ता न्याहली गावाजवळ नंदुरबार जि.नंदुरबार येथे टाटा कंपनीचा पॅक बॉडी असलेला कंटेनर (क्र. MH – 46 – F – 4868) सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल ब्ल्यु व्हिस्की (Royal Blue Whiskey) १८० मि.ली. क्षमतेच्या एकुण १ लाख ३६८० पेट बाटल्या (२१६० बॉक्स) दिसुन आले.

तेथे वाहनासह संशयित आरोपी रोहित जालिंधर खंदारे रा. पोखरापुर खंदारे वस्ती ता. मोहोळ जि. सोलापुर, अविनाश मोहन दळवे रा.पोखरापुर पाण्याच्या टाकीजवळ ता. मोहोळ जि. सोलापुर यांना अटक करण्यात आली असून कंटेनरसह एकुण १ कोटी १४ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १ ९ ४ ९ अंतर्गत कलम ६५ (अ) (ई), ८०, ८१, ८३, ९ ०, ९ ८ (२), १०३१०८ अन्वये करण्यात आली. सदरची कार्यवाही डी . एम . चकोर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, पी. जे. मेहता दु. निरीक्षक, एस.एस. रावते दुय्यम निरीक्षक, पी. एस. पाटील दु. निरीक्षक

सोबत जवान सर्वश्री अविनाश पाटील, भुषण एम.चौधरी, हितेश जेठे, वाहन चालक हेमंत डी पाटील, राजेंद्र एन पावरा, एम.एम. पाडवी, संदीप वाघ, हर्षल आर नांद्रे इत्यादींनी यशस्वीरीत्या पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी. जे. मेहता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या