Friday, February 6, 2026
Homeजळगाववीज कोसळल्याने शेतमजूर जागीच ठार

वीज कोसळल्याने शेतमजूर जागीच ठार

अडावद ता.चोपडा – वार्ताहर

येथून जवळच असलेल्या लोणी ता.चोपडा येथील ३५ वर्षीय शेतमजूर खर्डी शिवारातील एका शेतात केळी लागवड करीत असताना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास वीज कोसळून जागीच गतप्राण झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

लोणी येथील शिवाजी चैत्राम कोळी वय ३५ हा आज दि.१५ मंगळवार रोजी खर्डी शेत शिवारातील इच्छापुर शिवारातील शेतात केळी खोडाची लागवड करण्यासाठी गेलेला असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक वादळ वाऱ्यासह विजेच्या गडगडाट सुरू झाला त्यात शिवाजी कोळी यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच गतप्राण झाले.

YouTube video player

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार होता. घरातील कर्ता पुरुष नैसर्गिक आपत्तीने गतप्राण झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...