Wednesday, April 2, 2025
Homeनाशिकउपबाजार समितीत शेतकर्‍यास मारहाण

उपबाजार समितीत शेतकर्‍यास मारहाण

पाच जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मुंगसे येथील उपबाजार समितीत कांद्याचा लिलाव झाल्यानंतर तो पिकअप वाहनातून खाली करण्यासाठी गेलेल्या चिखलओहोळ येथील शेतकर्‍यास कांदा परत नेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

चिखलओहोळ येथील शेतकरी दीपक पंडित पानसरे (45) या शेतकर्‍याने मारहाणीसंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत पिकअप वाहनातून विक्रीसाठी नेलेल्या काद्याचा मुंगसे उपबाजार समितीत लिलाव झाल्यानंतर सदर पिकअप वाहन ते कांदा साठवण चाळीजवळ नेले असता या ठिकाणी उपस्थित असलेल्या पाच जणांनी कांदा खराब झाला असल्याने परत घेवून जाण्यास सांगितले.

मात्र पानसरे यांनी कांदा तुम्ही पुन्हा वाहनात भरून द्या असे सांगितल्याचा राग येवून पोपट, काळू, रोहित सुर्यवंशी, राहुल सुर्यवंशी व काटा करणारा कामगार अशा पाच जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवा. खुरासने हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : 114 वा श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी साई संस्थानची तयारी...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईबाबा संस्थानच्या वतीने यावर्षी शनिवार दि. 5 एप्रिल ते सोमवार दि. 7 एप्रिल 2025 याकाळात 114 वा श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार...