Monday, November 16, 2026
Homeनाशिकउपबाजार समितीत शेतकर्‍यास मारहाण

उपबाजार समितीत शेतकर्‍यास मारहाण

पाच जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मुंगसे येथील उपबाजार समितीत कांद्याचा लिलाव झाल्यानंतर तो पिकअप वाहनातून खाली करण्यासाठी गेलेल्या चिखलओहोळ येथील शेतकर्‍यास कांदा परत नेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

चिखलओहोळ येथील शेतकरी दीपक पंडित पानसरे (45) या शेतकर्‍याने मारहाणीसंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत पिकअप वाहनातून विक्रीसाठी नेलेल्या काद्याचा मुंगसे उपबाजार समितीत लिलाव झाल्यानंतर सदर पिकअप वाहन ते कांदा साठवण चाळीजवळ नेले असता या ठिकाणी उपस्थित असलेल्या पाच जणांनी कांदा खराब झाला असल्याने परत घेवून जाण्यास सांगितले.

मात्र पानसरे यांनी कांदा तुम्ही पुन्हा वाहनात भरून द्या असे सांगितल्याचा राग येवून पोपट, काळू, रोहित सुर्यवंशी, राहुल सुर्यवंशी व काटा करणारा कामगार अशा पाच जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवा. खुरासने हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ नोव्हेंबर २०२६ – इस्त्रायलमध्ये राजकीय समीकरणांची कसोटी!

0
इस्त्रायलच्या राजकारणातील उलथापालथ केवळ सत्तांतराची नांदी नाही, तर देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सुरक्षा धोरणांचा फेरविचार करण्याची संधीही आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या...