धुळे । dhule। प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील सोलापूर (Solapur) तालुक्यातील आडत व्यापार्यांनी (crooked traders) साक्री तालुक्यातील रूनमळी येथील शेतकर्याची (farmer) सव्वादोन लाखात फसवणूक(cheated) केली. सोलापूर बाजार समितीत विक्री केलेल्या 553 कांदा गोणीचे पैसे बुडविले. पैसे मागितल्यानंतर उलट शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघा व्यापार्यांवर निजामपूर पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सचिन नरेंद्र पवार (वय 32 रा. रूनमळी ता. साक्री) या शेतकर्याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास रूनमळी शिवारातील फिर्यादी याच्या शेतातील 553 कांदा गोणी कांद्याचे आडत व्यापारी राजकुमार रामचंद्र माशाळकर व नारायण रामचंद्र मासळकर (रा. गाळा क्र. 152 श्री सिध्देश्वर मार्केट यार्ड, सोलापूर जि. सांगली) यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून सोलापूर बाजार समितीत विक्री केला.
मात्र कांदा विक्रीचे खर्चवजा करून आलेले दोन लाख 33 हजार 895 रूपये फिर्यादी सचिन पवार यांना दिले नाही. त्याबाबत विचारपुस केली असता दोघांनी त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. दोघांनी कांदा विक्रीचे पैसे हडप करून फसवणूक केली. पुढील तपास पीएसआय काळे हे करीत आहेत.