Sunday, September 15, 2024
Homeनगरऔषध फवारणी करताना अंगावर विजेची तार पडून शेतकरी ठार, दोघे जखमी

औषध फवारणी करताना अंगावर विजेची तार पडून शेतकरी ठार, दोघे जखमी

वैजापूर । प्रतिनिधी

- Advertisement -

शेतात औषध फवारणी करत असताना विजेची तार अंगावर पडून एकजण ठार तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना तालुक्यातील नांदूरढोक शिवारात घडली. काशिनाथ रामदास गाढे (वय 70 वर्षे राहणार नांदूरढोक) असे या घटनेतील मयत शेतकऱ्याचे नाव आहे, तर विशाल काशिनाथ गाढे (वय 26 वर्षे राहणार नांदूरढोक) साहेबराव कारभारी गाढे (वय 65 वर्षे) हे या अपघातात जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तालुक्यातील नांदूरढोक शिवारातील मध्ये काशिनाथ रामदास गाडे यांची शेती आहे. या शेतीमध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते व त्यांचा मुलगा विशाल हे औषध फवारणी करत होते. फवारणी करत असताना अचानक त्यांच्या अंगावर महावितरणची विद्युत तार तुटून पडली. ही बाब बघितल्यावर नातेवाईकांनी आरडा ओरडा केला तेव्हा आरडा ओरडा ऐकू आल्याने त्याच्या शेता शेजारील शेतात काम करत असलेले साहेबराव गाढे हे मदतीसाठी धाऊन आले.

तक्रार घेऊन आलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाकडूनच अत्याचार, राहुरीमध्ये खळबळ

मात्र पडलेल्या तारेला त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा धक्का लागून ते फेकल्या गेले. तार तुटली असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले, तेथे उपस्थित संदीप गाढे याने डीपीचा डियो काढून डीपी बंद केली व विद्युत प्रवाह खंडित केल्या. नंतर तिघांना तत्काळ वैजापूर येथील देवगिरी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र काशिनाथ गाढे यांना तपासून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. विशाल व साहेबराव यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने टॅक्सीला उडवलं, ६ जणांचा जागीच मृत्यू… घटना CCTVत कैद

- Advertisment -

ताज्या बातम्या