Wednesday, April 2, 2025
Homeधुळेधुळ्यात एकावर तलवारीने जीवघेणा हल्ला ; सहा जणांवर गुन्हा

धुळ्यात एकावर तलवारीने जीवघेणा हल्ला ; सहा जणांवर गुन्हा

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील चाळीसगाव रोड पोलिस (police) ठाणे हद्दीतील अलहेरा हायस्कूलजवळ लहान मुलांच्या भांडणातून व्यवसायीकासह त्यांच्या नातेवाईक मारहाण करण्यात आली. तर व्यवसायीकावर तलवारीने जिवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत परवेज मुस्ताक मनीयार (वय 37 रा. प्लॉट नं. 54, शंभर फुटी रोड, धुळे) या जखमी व्यावसायीकाने चाळीसगाव रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 5 जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून शहाबान शहा, अबरार शहा, शफिक शहा पठाण, शाकिर शहा, एजाज शहा, उस्मान शहा हमीदशहा सर्व (रा.अलहेरा हायस्कूल जवळ, जामचामळा, धुळे) यांनी तलवार, काठ्या घेवून त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केली. तर अबरार शहा याने तलवारीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने परवेज यांच्या डोक्यावर मारले. त्यात ते जबर जखमी झाले. पुढील तपास पोसई संदीप ठाकरे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik आडगाव हद्दीतील धात्रक फाटा परिसरामध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. तर, ५० हजारांचा...