भुसावळ – Bhusaval
येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.७ ते १३ जुनपर्यंत कोरोना नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन घोषित केले असून उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा भुमी संपादन अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली न.पा.च्या पथकाने विविध ठिकाणी कारवाई करुन तब्बल ५६ हजार रुपयांचा दंड वसुल केला केली.
दंड वसुल करण्यात आलेल्यांमध्ये अरिहंत प्रोव्हीजन (आनंद नगर), बिलाल किराणा (मोहम्मदिया नगर), आर.आर.एंटरप्रायजेस (पुजा कॉम्प्लेक्स जवळ, मधु डेअरी (विठ्ठल मंदीर वार्ड), इंदौर गॅरेज (जामनेर रोड) या दुकानांसह मास्क न लावता फिरणाण्यां विरूध्द दंडात्मक कारवाई करून ५६ हजार ५०० रूपयांचा दंड वसुल केला.
ही कारवाई संजय बनाईते, पंकज पन्हाळे, परवेज शेख, सुरज नारखेडे, चेतन पाटील, विशाल पाटील, किरण मनवाडे, अनिल मनवाडे, राजेश पाटील, गोपाल पाली, योगेश वाणी, स्वप्निल भोळे, मयुर भोई, पो. कॉ. दिपक शिंदे, पो.कॉ. चारूदत्त पाटील, पो.कॉ. किशोर पाटील यांच्या पथकाने केली.