Tuesday, September 17, 2024
Homeनाशिकमाळेगाव औद्योगिक वसाहतीत कारखान्याला भीषण आग

माळेगाव औद्योगिक वसाहतीत कारखान्याला भीषण आग

लाखोंचे नुकसान; सुदैवाने जीवित हानी टळली

सिन्नर | वार्ताहर

- Advertisement -

तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील ऑटो कॉम या कारखान्याला आज (दी.१४) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये कारखान्याचा दुसरा मजला पूर्णपणे जळून खाक झाला असून तेथे ठेवण्यात आलेले लाखोंचे पॅकिंग मटेरियलचे नुकसान झाल्याचे समजते.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी कारखान्याचे जवळपास एक ते दोन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती सीमाचे सचिव बबन वाजे यांनी दिली आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या या कारखान्यात विविध वाहनांचे स्पेअर पार्ट बनवण्यात येतात. कारखान्यात साधारणत: एका शिफ्टमध्ये 200 ते 250 कामगार काम करतात. कारखान्यात बनवण्यात आलेले पार्ट पॅकिंग करून कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येतात.

आज सायंकाळच्या सुमारास अचानक कारखान्याच्या दुसऱ्या मजल्याला आग लागली. आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केल्याने कारखान्यात काम करत असलेल्या 200 ते 250 कामगार तेथून बाहेर निघाले त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.

आगीची माहिती कळताच सिन्नर नगर परिषद व एमआयडीसीचे अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवळपास सात ते आठ बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच सीमा संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी ही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या