Friday, April 25, 2025
Homeनाशिकवावी - पंचाळे रस्त्यावर चार चाकी वाहन जळून खाक

वावी – पंचाळे रस्त्यावर चार चाकी वाहन जळून खाक

सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही

- Advertisement -

वावी | वार्ताहर

सिन्नर तालुक्यातील वावी पंचाळे रस्त्यावर पंचाळे गावानजीक वडनेर भैरव येथील रहिवासी असलेले आजम अब्दुल शेख यांच्या इको कार क्रमांक MH04 HY 1706 ने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली. चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.

अचानक गाडीने पेट घेतल्यावर वाहनातील आझम शेख यांनी व सोबत असलेले एक यांनी तात्काळ गाडीच्या बाहेर उड्या घेल्याने वाहनातील दोघांचा जीव बचावला.

घटना समजतात वावी येथील काही तरुण रस्त्याने जात असताना सदरचा प्रकार लक्षात आला. यावेळी योगेश गवळी, ज्ञानेश्वर खाटेकर, संदीप सरवार, भारत वेलजाळी मदत कार्य केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...