Friday, September 20, 2024
Homeनाशिकचार चाकी वाहनाने घेतला पेट

चार चाकी वाहनाने घेतला पेट

सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही

- Advertisement -

नाशिक रोड | प्रतिनिधी Nashikroad

शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याच्या चार चाकी वाहनाने नाशिक रोड पोलीस स्थानकासमोर अचानक पेट घेतल्याने या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतल्याने पाण्याचा व फोमचा मारा केल्याने आग आटोक्यात आली .

पोलिस आयुक्तालयातील कर्मचारी वाजे हे नाशिक रोड पोलीस ठाण्यात काही कामानिमित्त आले असता त्यांनी आपले चार चाकी वाहन क्रमांक एम एच 15 इपी 47 43 या क्रमांकाची गाडी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर लावून ते पोलीस ठाण्यात गेले होते त्यानंतर गाडी मधील मशीन जवळच्या वायरिंग ने अचानक पेट घेतल्याने मोठा भडका उडाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात बाहेर धूर येउ लागल्याने नागरिकांची पळापळ झाली.

तातडीने अग्निशामक दलाला ही घटना कळविण्यात आली त्यामुळे अग्निशामक दलाचे कर्मचारी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाणी व फोम चा मारा केल्याने आग आटोक्यात आली मात्र त्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दरम्यान या प्रकारामुळे नाशिक रोड पोलीस स्थानक ते दत्त मंदिर चौकापर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या